औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद बाजारपेठेत पिवळ्या रंगाचे कलिंगड विक्रीसाठी आल्याने ग्राहक अचंबित झाले आहे. आजपर्यंत आपण लाल रंगाचे कलिंगड पाहिले.
मात्र, पहिल्यांदाच पिवळ्या रंगाचे कलिंगड बाजारात विक्रीसाठी आल्याने ग्राहक अचंबित झाले असून कलिंगड घेण्यासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विद्यापीठाने पिवळ्या रंगाचे कलिंगड विकसित केले असून ते खाण्यासाठी गोड आहे. त्यामुळे ग्राहकांनी याला पसंदी दर्शवल आहे
Leave a comment