बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगाव बाजार व परिसरात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील होताच अवैध देशी दारु विक्रेते नव्या दमाने सक्रिय, सबंधीत विभागाचे मात्र हेतूपुरस्कर दुर्लक्ष ? तरी वरिष्ठ आधिकांर्यानी या प्रकरणाकडे जातीने लक्ष द्यावे व परिसरातुन देशी दारू हद्दपार करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
देशात व राज्यात कोरोना रोगाने थैमान घातलेला होता व प्रत्येक राज्याना आपल्या पध्दतीने लाँगडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिली,व याचाच फायदा घेत बोरगाव बाजार,कोटनांद्रा ,सोनाप्पावाडी , म्हसला व सावखेडा फाटा,आडगांव फाटा ,देऊळगांव बाजारसह परिसरातील अवैध दारू विक्रेते मोठ्या जोमाने सक्रिय झालेले दिसुव येत आहे,कारण बोरगांव बाजारसह वरिल सर्व परिसरात अवैधरित्या बनावट अवैध देशी दारूची खुलेआम पार्सलने व दुकानामधुन विक्ऱी होत आहे,असे आसताना सुध्दा व कोण कुठे अवैध दारुची विक्री करतो याची सर्व माहीती ही संबधित पोलीस कर्मचार्यानां आहे, असे असताना सुध्दा सबंधीताकडुन कुठल्याच प्रकारची कार्यावाही या दारु विक्री करणारावर का केली जात नाही,अशी चर्चा नागरिकांतुन ऐकायला मिळते,व या माहामारीच्या कठीण काळात या अवैध दारू विक्रीने सावखेडा फाटा,चिचोली फाटा व बोरगांव बाजार बसस्थानक परिसरात सर्वात जास्त प्रमाणात अवैध देशी दारु विक्री होत असते,व हे दारू विक्रीवाले पोलीसांच्या नाकावर टिच्चुन आपले विक्री पार्सलद्वारे किवा दुकानथाटुन दुध विक्रीसारखी मोठ्या थाटात करतात, या विक्रेत्याना अवैध दारु विक्री विषयी विचारणा केली आसता,आमचे दुकान आहे व इतर ठिकाणी पण अशाच प्रकारे दारूची विक्री चालु आहे, त्यामुळे आमच कोणी काहीच करु शकत नाही संबधीत विभागाला याची सर्व माहीती आहे कि बोरगाव परिसरात कोण,कोण दारु विकतो तेच तर आम्हाला मदत करता, पण तुम्ही कशाला या विषयात पडता असे उत्तर हे दारु विक्रेते सर्व सामान्याना दम देताना दिसुन येतात.
दुसरीकडे पोलीसाना हेच अवैध धंदे करणारे सापडत नाही, असा कांगावा पोलीस नेहमीच करतात, अवैध दारूचे धंदे करणारे आपले धंदे व्यवस्थीत चालवण्यासाठी संबधीत खात्याच्या काही कर्मचार्यांना हाथाशी धरुन महिन्याच्या ठराविक तारखेला हे आर्थिक हित सबंध जपतात व यामुळे पोलीसांना ज्याचे खावे मिठ त्याची चाकरी करावी निट या म्हणी प्रमाणे काम करावे लागतेयाप्रकारे अवैध दारू विक्री करणारावर कोणत्याच प्रकारची कार्यावाहीच करता येत नाही,एखाद्या गावक-यांनी पोलीसाकडे याअवैध धंदे विषयी विचारणा केली आसता तुम्ही आम्हाला कोण दारु विकतो याची माहीती द्या आम्ही कार्यवाही करतो असे म्हणतात, परंतु नविसरता व नरस्ताचुकता दर महीण्याला या देशी दारू विक्रीकरणारांकडे जाऊन आपले हित संबध जपतात तेव्हा यांना सर्व दारू विक्रेत्याची माहीती असते असे गांकर्यांते म्हणने आहे,गावकर्यांनी अवैध दारू विक्री विषयी विचारले असता उलट पोलीसांकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात व बोरगांव परिसरात एकप्रकारे अवैध धंदे करणाराना अभय देण्याचे काम पोलीस ईमानेइतबारे पारपाडताना दिसुन येतात. तरी संबधीत वरिष्ट अधिकार्यांनी या प्ररकरणाकडे विशेष लक्ष देऊन बोरगांवातील अवैध दारू विक्री हद्दपार करावी अशी मागणी गावकर्यांसह परिसरातुन होत आहे.
Leave a comment