वांगी बुद्रुक ग्रामपंचायतला तिन लाखाचे बक्षीस जाहीर
भराडी । वार्ताहर
वांगी बुद्रुक ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत 2018-19 संदर्भीय (1) निर्णयातील परिपत्र क्रमांक दोन मध्ये नमुद केलेल्या निकषाप्रमाणे जिल्हास्तरीय तपासणी झालेली असुन जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतीची प्रथम क्रमांक पाच लक्ष रूपये, द्वितीय क्रमांक तिन लक्ष रुपये, तृतीय क्रमांक दोन लक्ष राष्ट्रसंत स्वच्छ ग्रामस्पर्धा सन 2018-2019 करिता बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्पर्धेत सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक या ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सदरील ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकाचे तिन लक्ष रूपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
वांगी बुद्रूक गावामध्ये शंभर टक्के शौचालय असुन गाव हागणदारी मुक्त झालेले आहे. गावक-यांसाठी दहा रुपयात मिनरल वाटर फिल्टरचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तसेच गावामध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी साठ टक्के शैचखड्डे तयार करण्यात आले आहे. सदरील ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक एक लक्ष रूपये व प्रशस्ती पञ, स्वर्गीय वसंतराव नाईक पाणी गुणवत्ता जिल्हा स्तरावरील विशेष पुरस्कार रोख पंचवीस हजार रूपये व प्रशस्ती पञ,स्मार्ट ग्राम अंतर्गत तालुका स्तरावर प्रथम दहा लक्ष रूपयाचे बक्षीस जाहीर झालेले आहे. वांगी ग्रामपंचायतचे सरपंच महेश पाटील यांना लोकमत सरपंच ऑफ दि ईयर या अवार्डने गौरविण्यात आलेले आहे.
Leave a comment