औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1316 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 122 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3360 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  नवजीवन कॉलनी (1), गरम पाणी (1), पडेगाव (1), जाधववाडी (4), राजाबाजार (1), एन नऊ हडको (1), ठाकरे नगर (1), बजाज नगर (1), एन सहा (1), शिवाजी नगर (1), नागेश्वरवाडी (3), शिवशंकर कॉलनी (2), गजानन नगर (2), छत्रपती नगर (1), दर्गा रोड (1), एकता नगर, हर्सुल (1), हनुमान नगर (1), सुरेवाडी (3), टीव्ही सेंटर (1), एन आठ सिडको (1), श्रद्धा कॉलनी (4), एन सहा, सिंहगड कॉलनी (1), आयोध्या नगर (1), बायजीपुरा (3), कोतवालपुरा (1), नारळीबाग (2), अंबिका नगर, मुकुंदवाडी (4), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (1), समता नगर(1),  सिंधी कॉलनी (2),  बजाज नगर (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), जयसिंगपुरा (2), सिडको एन अकरा (1),  नेहरू नगर, कटकट गेट (2), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर, नक्षत्रवाडी (1), भाग्य नगर (4), शिवाजी नगर (1), पदमपुरा (1), उत्तम नगर (2), खोकडपुरा (2), टिळक नगर (1), पिसादेवी (1), बीड बायपास (2), सखी नगर (3), जिल्हा परिषद परिसर (1), सारा गौरव बजाज नगर (3), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (6), पंचमुखी महादेव मंदिराजवळ बजाज नगर (4),  जय भवानी चौक, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (3),  दीपज्योती हाऊसिंग  सोसायटी बजाज नगर (1),  दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (1),  देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (2), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), मांडकी (1), पळशी (5), जय हिंद नगरी, पिसादेवी (1), कन्नड (1), मातोश्री नगर, औरंगाबाद (1), गोरख कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), पालखेड, वैजापूर (1),  शिवाजी कॉलनी (1), पानचक्की रोड (1), बारूदगर नाला (1), सादात नगर, रेल्वे स्टेशन (1), कबीर नगर (1), एन सात सिडको (1), रशीदपुरा (1), सिद्धीविनायक अपार्टमेंट (1), सिडको एन चार (1), रेहमानिया कॉलनी (1), विश्वास नगर (1), हडको (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये 55 स्त्री व 67 पुरुष आहेत.
आतापर्यंत 1857 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत सात, खासगी रुग्णालयांत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 19 जून रोजी  सकाळी 10.15 वाजता लोटा कारंजा येथील 45 वर्षीय स्त्री रुग्णाचा, रात्री दहा वाजता जटवाडा, हर्सुल येथील साइदा कॉलनीतील 55 वर्षीय स्त्री, रात्री एक वाजता नाशिक जिल्ह्यातील येवला येथील  48 वर्षीय स्त्री, मध्यरात्री 1.15 वाजता  शिवाजी नगर, गारखेडा येथील 55 वर्षीय स्त्री , तर 20 जून रोजी मध्यरात्री 1.15 वाजता राजा बाजार परिसरातील 65 वर्षीय स्त्री, सकाळी 9.45 वाजता रांजणगाव, ता.गंगापूर येथील 29 वर्षीय स्त्री आणि बेगमपुरा येथील 47 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी 2.10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत 140 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 137 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते.
तर शहरातील एका खासगी रुग्णालयात 19 जून रोजी सायं.5.15 मंजुरपुर्‍यातील 59 वर्षीय पुरूष रुग्णाचा, जुना बाजार येथील 52 वर्षीय पुरूष रुग्णाचा 20 जून रोजी सकाळी 7 वाजता, तर अन्य एका खासगी रुग्णालयात रोजा बाग येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी एक वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 137, औरंगाबाद शहरातील  विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 49, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 187 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळ पॅटर्न 
लॉकडाऊननंतर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 17 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दररोज शंभर रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी महापालिकेने केरळ पॅटर्नचा अवलंब केला आहे. यामध्ये रुग्णाला शोधून काढणे, विलगीकरण, तपासणी, उपचार या चार बाबींवर सर्वाधिक भर देण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. 
118 मंगल कार्यालये ताब्यात घेणार
क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये चार हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन हजार क्वारंटाईन बेड आहेत, अशी माहिती देताना आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, भविष्यात क्वारंटाईन करावयाच्या व्यक्तींची संख्या वाढलीच, तर निवासाची व्यवस्था अपुरी पडू नये म्हणून महापालिकेच्या नऊ झोनच्या कार्यक्षेत्रात असलेली 118 मंगल कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहेत. 
सोमवारनंतर स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू होईल
कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने अवघ्या काही दिवसांमध्ये चिकलठाणा एमआयडीसी भागात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभे करून मनपाच्या ताब्यात दिले आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याचे थोडेसे काम शिल्लक आहे. 22 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. तोपर्यंत महापालिकेची कंत्राटी पद्धतीवरील भरती प्रक्रिया पूर्ण होईल. रुग्णालय लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली. कोरोना आजाराचा मुकाबला करताना शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 10 हजार रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. आजही शहरात 700 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लसींचा वापर करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात ही लस उपलब्ध आहे. एकही रुग्ण रस्त्यावर नाही. महाराष्ट्र शासनाने अत्यंत कमी कालावधीत औरंगाबादकरांसाठी चांगले सुसज्ज रुग्णालय उभे करून दिले आहे. ते लवकरच सुरू होईल.
रुग्ण दाखल न केल्याची तक्रार
शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यासंदर्भात गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपातील एका अधिकार्‍याची यासंदर्भात समिती नेमली जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. 
उपलब्ध बेडची माहिती घरबसल्या
शहरातील कोणत्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहेत, याची माहिती संबंधित रुग्णालयांनी एलईडी स्क्रीनवर लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश रुग्णालयांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 4नागरिकांना घरबसल्या उपलब्ध बेडची परिस्थिती पाहण्यासाठी महापालिकेचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.  दिवसभरातून तीन वेळेस यातील माहिती अपडेट करण्यात येते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.