सोयगाव । वार्ताहर
कोविड-19 या जागतिक महामारी मध्ये कोरोना योध्दांसोबत राज्यातील तमाम शिक्षक बांधव,भगिनींनी जिवाची पर्वा नकरता वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन आदेशा नुसार सेवा दिली.कोविड-19 या महामारीत सेवा देणार्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना येणार्या जिल्हांतर्गत बदल्यां मध्ये प्राधान्य क्रम मिळावा तसेच या शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत या सेवेची नोंद व्हावी आणी या सेवेच्या दिवसा येवढी अर्जित रजा शिक्षकांना मिळावी अशी मागणी शिक्षक भारती सोयगांवचे तालुका अध्यक्ष किरणकुमार पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.
Leave a comment