औरंगाबाद । वार्ताहर
जिल्हयात कोरोनाची संख्या दररोज झपाट्याने वाढत असताना आता जिल्हा परिषदेतदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात तब्बल आठपेक्षा अधिक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने वर्क फ्रॉम होमची मागणी सीईओ यांच्याकडे केली आहे.
शहरात तीन हजारांचा टप्पा ओलांडत असतांनाकोरोना विषाणुचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाहिये. बहुतेक सर्वच परिसरामधे कोरोनानेआपला प्रादुर्भाव केला आहे. आता जिल्ह्यातील ग्रामीण भाग सांभाळणार्या जिल्हा परिषदेच्यामुख्यालयातदेखिल कोरोनाने शिरकाव केला आहे. बुधवार, 17 जुनपर्यंत झेडपी मुख्यालयात आठहुन अधिक पोझिटिव्ह केसेस आढळल्याने मुख्यालयातील कर्मचार्यांमध्ये धास्तीचे वातावरणपसरले आहे. सदरील गंभीर परिस्थितीवरुन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्याऔरंगाबाद शाखेने सीईओ यांच्याकडे कर्मचार्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्याची मागणी केलीआहे. युनियनचे सचिव प्रदिप राठोड यांनी पत्रात म्हंटले आहे कि, मुख्यालयात आठहुन अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुख्यालयात पॉझिटिव्ह रुग्ण आढळुनही जि.प.प्रशासनाकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर,रबरी हॅन्डग्लोव्ह्ज आदी साहित्य वितरीत करण्यात आलेले नाहीत. कर्मचारी स्वखर्चाने यावस्तु वापरत आहेत. उपाययोजनेअभावी कोणी कर्मचारी किंवा त्याचे कुटुंब पॉझिटिव्ह झाल्यासयाला जबाबदार कोण, असेही युनियनने विचारले आहे. खबरदारी म्हणून कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी द्यावी तसेच शासनाने लागु केलेले जिवन विमा धोरण जि.प.कर्मचार्यांनाही लागु करावेयासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली असून अन्यथाआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
Leave a comment