औरंगाबाद । वार्ताहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) औरंगाबाद तर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना रोगाच्या कामासंदर्भात एकत्रित ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती करावयाची आहे. त्यासाठी महापालिकेत उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
याबाबतची सविस्तर जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिराती अंतर्गत विविध जीवरसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, औषधीशास्त्र विभाग, बालरोगशास्त्र विभाग, वार्धक्यशास्त्र विभाग, बधिरीकरणशास्त्र विभाग, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभाग, कान, नाक व घसाशास्त्र विभाग, शल्यचिकीत्सा शास्त्र विभाग, सीव्हीटीएस आयसीसीयु, कॅम्युलटी जे आर 1 आणि एन. आय. सी. यु. इत्यादींची पदे प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक चणचण भासली आहे, तसेच बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने महापालिकेत उमेदवारांची एकच गर्दी पडल्याचे बोलले जात आहे.
Leave a comment