सिल्लोड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा युवासेनाप्रमुख ना. आदित्य उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ तसेच ब्लँकेट वाटण्यात आले .
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, डॉक्टर दत्ता भवर, रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या दिपाली भवर आदींची उपस्थिती होती. शिवसेना पक्ष वर्धापन दिन तसेच युवा सेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन व युवानेते अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवा सेनेच्या वतीने सिल्लोड - सोयगाव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल यांनी सांगितले.
Leave a comment