औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना या संसर्ग रोगाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद औरंगाबाद व पंचायत समिती खुलताबाद च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत कोरोना जनजागृती’ या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
पंचायत समिती खुलताबाद येथून या कोरोना जनजागृती रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भेटी देऊन कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी, नियमित मास्क घालणे, वारंवार हात धुणे, परिसर स्वच्छ ठेवणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, उघड्यावर थुंकू नये,खोकलताना, शिंकताना हात रुमालाचा वापर करणे,आदी बाबत जनजागृती करण्यात येत आहे.
खुलताबाद तालुक्याचे तालुका समन्वयक राजेंद्र दांडेकर हे कोरोना जनजागृती चा पोशाख परिधान करून या यात्रेत प्रबोधन करीत आहेत तसेच प्रबोधनात्मक निवेदन तयार करण्यात आलेले आहे. या निवेदनाचे ध्वनिक्षेपणाद्वारे प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये प्रसारण करण्यात येत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष मार्फत तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिका चे वाटप या रथयात्रेत केले जात आहे.
ग्रामस्थांकडून या करोना जनजागृती रथ यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे या रथयात्रेच्या वेळी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका संपर्क अधिकारी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राम लाहोटी गट विकास अधिकारी डॉ मोकाटे विस्तार अधिकारी पंचायत कहाते यांनी केले आहे.
Leave a comment