बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव बाजार व परिसरात मान्सुनपुर्व कामाना वेग,लाँगडाऊनच्या काळामध्ये शेतकरी लागले कामाला,
कोरोनाच्या भयकंर महामारीच्या प्रार्श्वभुमीवर केंद्राकडुन सर्व क्षेञातील कामे पुर्ण शंभर टक्के बंद ठेवत लाँगडाऊन करण्यात आले होते, नतंर केंद्र व राज्य सरकारने तिसर्यां लाँगडाऊनदरम्यान सर्व शेतीयुक्त कामाना सुट देण्यात आल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील बोरगांव बाजार,बोरगांव सारवाणी, कोटनांद्रा, सावखेडा, खातखेडा,म्हसला,तळणी, कासोद,देऊळगांव बाजारसह परिसरातील सर्व शेतकरी मान्सुन पुर्व मशागतीच्या कामात मग्न झालेले दिसुन आले,यावेळी शेतकर्यांनी उन्हाळी बाजरी, कांदा, ज्वारीची कणीस काढणी (कापनी) करुन आपले शेत रिकामी करुन घेत जसे शक्य होईल तसे बैल जोडीनागर,टँक्टरच्या साह्याने नागरनी,वखरनी करुन मान्सुन पुर्व कामे उरकताना दिसत आहे,तसेच यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार बर्यापैकी 100 टक्के पाऊस पडेल असे वर्तवल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे ,साधारण 10 ते 15 जुन दरम्यान पेरण्याना सुरूवात होईल असे हवामानने सांगितले आहे,त्या अनुशंषगाने शेतकरी मोठ्या उत्साहने कामाला लागले आहे, कपाशी,अद्रकची सरी काढणे,ढिबक सिचंन लावने इत्यादी कामे पुर्ण उरकताना दिसत आहे.
Leave a comment