औरंगाबाद । वार्ताहर
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील कोरोना संसर्ग आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती तसेच करण्यात येणारी उपाय योजनांचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी, मा प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद श्री आस्तिक कुमार पांडये, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटिल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, मनपा, एमआयडीसी, शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख अधिकार्यांची उपस्थिती होती. सदरील बैठकीत श्री पांडये यांनी मा पालकमंत्री यांना कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मनपातर्फे करण्यात आलेली उपाय योजनांची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मार्फतर सविस्तर माहिती दिली. याचात विशेषतः माझी हेल्थ माझ्या हाती (चकचक) या एप्लिकेशन बाबत श्री पांडये यांनी माहिती दिली. यावेळी, श्री पांडये यांनी ऑक्सिमिटर आणि थर्मल गन याची रिडींग कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक करून पालकमंत्री यांना दाखवले. त्यांनी मा पालकमंत्री यांचे शरीराचा तापमान थर्मल गन वापरून तपासले तर ऑक्सिमिटर लावून त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण तपासले. पालकमंत्री यांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन चे प्रमाण सामान्य होते. सदरील उपाय योजनेचे मा पालकमंत्री यांनी कौतुक केले.
यावेळी श्री पांडये यांनी माहिती दिली की घरोघरी जाऊन 50 वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे शरीराचे ताप व ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्याचे काम आशा वरकर्स आणि स्टाफ नर्स मार्फत सुरू आहे. श्री पांडये यावेळी म्हणाले की माझी हेल्थ माझ्या हाती या एप्लिकेशन मार्फत नागरिकांनी पाठवलेली माहितीचे विश्लेषण करण्यात येईल आणि ज्या नागरिकांमध्ये लक्षणे आढळतील त्यांची मदतीसाठी मनपा चे पथक तावरीत पाठविण्यात येईल. हा एप्लिकेशन चा उद्देश नागरिकांना वेळेचा आत उपचार देणे व त्यांना वाचवणे आशा आहे, श्री पांडये म्हणाले. सदरील एप्लिकेशनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, ते म्हणाले. या शिवाय, कंटेन्मेंट क्षेत्रात लोकांना अत्यावश्यक वस्तू आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती श्री पांडये यांनी दिली. यावेळी मा पालकमंत्री यांनी फिवर केंम्प (ताप शिबीर) चे आयोजन करण्याची सूचना दिली.
Leave a comment