औरंगाबाद । वाार्ताहर
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त प्रबंधक (रेजीस्ट्रार) श्री कलीमउल्लाह खान बिस्मिल्लाह खान यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
त्यांची नमाज ए जनाझा नवाबपुरा येथील काळी मशीद येथे सकाळी 9 वाजता अदा करून लागतच्या कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते जिल्हा व सत्र न्यायालयाचे माजी प्रबंधक साफिउल्लाह खान उर्फ शकील आणि जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अधीक्षक नदीमउल्लाह खान यांचे वडील होत.
Leave a comment