पाच रुपयात मिळणार जेवण ; युवानेते अब्दुल समीर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या संकटकाळात गोर गरीब व गरजू लोकांना नाममात्र दरात जेवण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सिल्लोड शहरात शिवभोजन सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे . युवानेते अब्दुल समीर यांच्या हस्ते शहरातील बस स्थानक परिसरात शनीवार ( दि.30) रोजी या शिवभोजन सुविधेचे उद्घाटन संपन्न झाले.
केवळ 5 रुपये यां नाममात्र दरामध्ये हे जेवण मिळणार असून सकाळी 11 ते 3 या वेळेत हे शिव भोजन सुरू असणार आहेत अशी माहिती देत गरजूंनी शिव भोजन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, शिवसेना तालूका प्रमुख किशोर अग्रवाल,नगरसेवक शेख सलीम हुसेन,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहम्मद हनिफ ,बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, आदींची उपस्थिती होती.
Leave a comment