सिल्लोड । वार्ताहर 

तालुक्यातील सावखेडा बु  शिवारातील  पुर्णा  नदीपात्रामध्ये अवैध गौणखनिज उत्खनन होत असल्याचे समजल्यावर  दि 29/05/2020 रोजी सकाळी   2.30 वा अचानक धाड टाकली असता श्री कदमसिंग किसन लोधवाल  रा बोरगाव वाडी यांचे ट्रकटर क्र चक 21 Aऊ 1936 व श्री शरद गणपत भोजने रा सावखेडा बु यांचे विना नंबर चे फर्गुसन  कंपनीचे  ट्रकटर यामध्ये प्रत्येकी 1 ब्रास क्षमतेचे ट्रकटर वाळूसह जप्त करण्यात आले.             

सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालय सिल्लोड येथे जमा करण्यात आले आहे . वरील वाळू माफीये यांचेविरुद्ध प्रत्येकी  एक ब्रास साठी रक्कम रु 130400  (अक्षरी- एक लाख तीस  हजार चारशे  रु मात्र) असे एकूण रक्कम रु 260800( अक्षरी- दोन  लाख साठ  हजार आठशे रु मात्र )  ची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे .सदर कार्यवाही पथक प्रमुख  संजय सोनवणे नायब तहसीलदार सिल्लोड,   गणपत दांडगे मंडळ अधिकारी , विष्णू पवार  तलाठी,  गिरीश झाल्टे  तलाठी,  संतोष इंगळे तलाठी,  कोतवाल दत्तू साळवे , कोतवाल मारोती सोन्ने ,  पोलिस पाटील महादू देवराव भोजने  यांनी सदर  कार्यवाही पूर्ण केली . तसेच  येणा-या काळात सुद्धा अवैध गौणखनिज वाहतूक करणा-या विरुद्ध अचानक धाडी टाकून अवैध गौणखनिज वाहतूक करणा-यांची वाहने जप्त करून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे श्री रामेश्वर गोरे तहसीलदार सिल्लोड  व श्री ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी इशारा दिला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.