दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज ; जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना । वार्ताहर
नवीन जालना परिसरातील एका खासगी रुग्णालयातील एक कर्मचारी व नुतनवाडी ता. जालना येथील एक अशा एकुण दोन रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर त्यांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर मठ पिंपळगाव ता. अंबड येथील 40 वर्षीय महिला, गोलावाडी-गणेशनगर ता. जालना येथील 40 वर्षीय महिला व मापेगाव ता. परतुर येथील 42 वर्षीय पुरुष अशा एकुण तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल दि. 31 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला आहे. तसेच मापेगाव येथील पुरुष अत्यावस्थ परिस्थितीमध्ये जिल्हा रुगणालयात दि. 29 मे रोजी दाखल झाला होता. त्या व्यक्तीचा दि. 29 मे रोजी मृत्यू झाला असुन मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल दि.31 मे रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सध्या रुग्णालयात 68 व्यक्ती भरती आहेत, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 81 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2711 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने - 03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -126 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2495, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -347, एकुण प्रलंबित नमुने -86, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-02, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-46, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-79, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 4382 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या 01 एवढी आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांनी गोलावाडी-गणेशनगर ता. जालना येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शाम गावंडे हेही उपस्थित होते. गोलावाडी-गणेशनगर ता जालना येथील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना करत 176 घरामधील जवळपास 900 व्यक्तीचे सर्वेक्षण तीन टीमच्या सहाय्याने सुरु करण्यात आले आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 361 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-3, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -21, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-24, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -110 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-06, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -20, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-28, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे -13 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -32, मॉडेल स्कुल मंठा-32, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -10, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -00 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 709 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 136 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 626 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 1 हजार 330 असा एकुण 3 लाख 28 हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
कोव्हीड केअर सेंटरमध्ये विविध उपक्रम
जालना शहरातील दोन कोव्हीड सेंटरमध्ये प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असुन जालना शहरातील संत रामदास मुलांचे वसतीगृह व शासकीय मुलींचे निवासी वसतीगृह या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ रहावे यादृष्टीकोनातुन योगासने घेण्यात आली. यापुढेही या कोव्हीड केअर सेंटरमध्ये या पद्धतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.
Leave a comment