शासनाचा 40 लक्ष रुपयाचा निधी
गुलदस्त्यात.ग्रामस्थाकडून संताप...
लेहा । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरणातील सांडव्यातील भिंत दुरूस्तीच्या कामाला पाट बंधारे विभागाकडून दिर्घ विश्रांतीनंतर सुरूवात करण्यात आली आहे. राज्य शासनाने या धरण दुरूस्तीच्या कामाला 40 लक्ष रुपयाचा निधी मंजुर करुन दिला आहे.माञ या निधीतील कामाला अद्यापही सुरूवात करण्यात आली नसल्याने हा निधी गुलदस्त्यात पडून आहे. परंतु काही दिवसापुर्वी लोकशाही न्यूज ने ही बातमी प्रसारीत केली व पाटबंधारे विभाग खडबडुन जागे झाले ...आणी आईन पावसाळ्याच्या तोंडावर खबरदारी बाळगत पाटबंधारे विभागाकडून संभाव्य धोका टाळण्यासाठी धरण दुरूस्तीच्या कामाला तात्पुरती सुरूवात करण्यात आली आहे.माञ हे काम केवळ थातुरमातुर होत असल्याचा आरोप लिहा,शेलुद,पारध,वडोद तांगडा येथील ग्रामस्थांनी केला आहे...केवळ वरच्यावर डागडुजी होत असल्याने शासनाने उपलब्ध करुन दिलेला निधी केव्हा खर्ची घालणार असा सवाल लिहा येथील साहेबराव सोनुने यांनी पाटबंधारे विभागाला विचारला आहे.
जर या पावसाळ्यात पाऊस जास्त झाला तर परिसरातील दाहा ते बारा गावांच्या नागरीकांचा जिवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी या प्रकरणाकडे जालना जिल्हाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी द्यावे. विशेष म्हणजे धामणा धरणाची दुरस्ती करण्याकरता चाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजुर झाला असतांना पाटबंधारे विभाग जुण्याच सांडव्याच्या भिंतीला डागडुगी करत आहे ,या मुळे पाणी थांबेल का आसा प्रश्न परिसरातील गावकर्यांना पडला आहे .व हा 40लक्ष निधी कुठे गेला ..या प्रकरणाची सखोल चौकाशी करावी .पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी मागील आठवड्यापासुन या धरण भिंतीच्या दुरूस्ती कामाला पाट बंधारे विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे.माञ संबंधित ठेकेदाराकडून या कामात गुणवत्ता राखल्या जात नसल्याचे दिसत आहे.ज्या ठिकाणी भिंतीला छिंद्र आहे आहे त्या ठिकाणी केवळ सिंमेटचा लेप लावल्या जात आहे.पाण्याच्या प्रवाहात हे काम टिकणार नसल्याचे नागरिक सांगत आहे.यंदा हवामान खात्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवीला आहे.त्यामुळे जास्त पाऊस झाला तर धरणाखालील गावे पुन्हा दहशतीखाली येणार असल्याचे वास्तव नाकरता येणार नाही.यामुळे शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतुनच हे काम व्हावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शेलुद येथील धामणा धरणाला जवळपास 49 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.पूर्वीपासूनच धरण दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याने सांडव्यातील भिंतीला गळती लागली होती.माञ शासनाने मोठा निधी या कामासाठी खेचुन आणला आहे.माञ लाँकडाऊनमध्ये या कामाचे घोडे अडकले आहे. पावसाळा तोंडावर आला तरी या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली नसल्याने हा निधी जर वेळेच्या आत खर्च झाला नाही तर निधी परत जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या सांडव्यातील 280 मिटर लांबी असलेल्या भिंतीला नुसता सिंमेट काँक्रेटीकरणचा कोट मारण्यात येत असल्याने परिसरातील नागरिक नवल व्यक्त करीत आहे. आणी या प्रकरणा विषयी पाटबंधारे विभागाला विचारले असता संपर्क होऊ शकला नाही. साहेबराव सोनुने ,ग्रामस्थ लिहा,ता.भोकरदन
Leave a comment