पालकमंत्र्याच्या मतदार संघात पाण्याचा ठणठणाट
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव अनेक वर्षापासून तहानलेलेच असून येथे ठोस अशी पाणीपुरवठा योजना गेल्या कित्येक वर्षापासून नसल्याने कुंभार पिंपळगाव तहानलेलेच आहे येथील रहेमान नगर मध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून पाण्याची मागणी होत असून देखील येथे आजही पाणीपुरवठा झाला नाही .येथील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आज भर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे माजी पालकमंत्री यांनाही निवेदन दिले होते त्यांनी खोटे आश्वासन देऊन आजपर्यंत वेळ मारून नेली तर माजी आमदारांनाही याबाबत वेळोवेळी पाण्याची मागणी करूनही मागणीकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचे येथील नागरिकांनी म्हणटले आहे.
रहेमान नगर येथील महिला - खाजाबी शेख उंबर, नूरबी शेखलाल, रूकसानाबी शेख पाशा, हाफिजाबी शेख कठू , लैलाबी शेख बाबू ,आधी महिलांनी शाईनाबी शेख इब्राहिम ,सलोनाबी शेख कालु आदि महिलांनी पालकमंत्री राजेश टोपे यांची गाडी अडवून पाण्याची कैफियत मांडली ते सीसी आय कापूस खरेदी केंद्राला भेट देण्यासाठी आले होते. कुंभार पिंपळगाव साठी 1एक कोटी 17 लाखांची पाणीपुरवठा योजना ही गेल्या दहा वर्षापासून अपूर्ण आहे ती पूर्ण होत नसून यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचे कुंभार पिंपळगाव करांनी मत व्यक्त केले आहे. गावांसाठी पाणीपुरवठ्याची मंजूर अर्धावट योजना ही दहा वर्षापासून योजना पूर्ण का होत नाही असाही ग्रामस्थांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे .पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून तात्काळ पाण्याची सोय करण्यात यावी नसता जिल्हाधिकार्यांकडे याबाबत आम्ही मागणी करणार असल्याचे रहेमान नगर येथील महिलांनी म्हटले आहे.या वेळी इब्राहिमभाई ,शेख ऊंबरभाई ,शेख रहिमभाई आदिंसह येथील रहिवाशी उपस्थितीत होते.
Leave a comment