तीर्थपुरी । वार्ताहर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून, महेंद्र पवार जि.प.उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थपुरीचे भूमिपूत्र गौतमजी मुनोत व सौ.डॉ.सोनालीदेवी मुनोत दाम्पंत्याच्या वतीने तीर्थपुरी ग्रामपंचायत मार्फत कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरपंच शैलेंद्र पवार यांच्या हस्ते तीर्थपूरी सर्व कुटूंबियांना मोफत होमियोपॅथी औषधींचे वितरण करण्यात येत आहे.यावेळी पहिल्या टप्यात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस प्रशासन, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा वर्कर, ग्रा.पं.कर्मचारी, होम क्वारटाईन कालावधी पुर्ण झालेले नागरीक, पत्रकार बांधव यांना सदर औषधींचे वाटप करण्यात आले. व त्यानंतर गावातील पाचशे कूटूंबीयांना औषधींचे वितरण करण्यात आले.यावेळी सरपंच शैलेंद्र पवार यांनी मूनोत दाम्पत्यांने सदर औषधी गावकर्यांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. व येत्या दोन दिवसात गावातील उर्वरीत कूटूंबियांना घरपोच होमओपॅथी औषधींचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी मेहेरनाथ बोबडे ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत बोबडे, परमेश्वर कडूकर, बबन गाडेकर, आण्णासाहेब चिमणे, गोरख चिमणे, बापूराव गूंजाळ, सुभाष चिमणे, राजेंद्र चिमणे, तूळशीराम वानखेडे, रमेश बोबडे, भरत साबळे, रवींद्र बोबडे, विष्णू वाजे, बद्रीनारायण भांगडीया, रविंद्र पवार, जनार्धन बारवकर, बाळासाहेब चव्हाण, अर्जून बोबडे, राजू वानखेडे, परमेश्वर पठाडे, आदी गावकरी उपस्थीत होते.
Leave a comment