जालना । वातार्र्हर
खडकेश्वर ताडहादगांव बृहत लघु तलावातील संपादीत क्षेत्रामध्ये शेतकर्यांनी अनाधिकृत खोदलेले विहिरी तात्काळ बुर्जविणे, पाणी उपसा थाबविणे, तळ्यातील पाणी उपासणारी एलटी लाईट बंद करणे करण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे करून देखील प्रशासनाचा कुठलाही अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने व तळ्यातील पाणी उपसा थांबत नसल्याने तळ्यामध्ये अमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन अंबड तहसिलदार यांना कुंडलिक हरिचंद्रे यांनी दिले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, खडकेश्वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातील अवैध पाणी उपसा, विजवितरण कंपनी व पाटबंधारे अधिकारी यांच्या संगणमताने देवाणघेवाण करुन पाणी उपसा सुरू आहे. पाणी उपसा थांबविण्यासाठी (4.10. 2019) रोजी गांवकर्यांच्या स्वाक्षर्यानिशी जिल्हाधिकारी व आयुक्त औरंगाबाद, तहसिलदार अंबड, पाटबंधारे विभाग जालना व पाटबंधारे विभाग अंबड यांच्याकडे दिले होते. त्यानंतर आयुक्तालयातून विहिरी बुजवा व पाणी थांबवा असे पत्र देखील आले होते. अंबड तहसील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन दिले तरी पण काहीही परिणाम झाला नाही. उलट वेळोवेळी पाटबंधारे अधिकारी व पाणी उपसा करणारे लोक जिवे मारण्याच्या धमक्या देऊ लागल्याने त्या बद्दल अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिली होती. परंतू यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. उपोषण करण्याची परवानगी मागण्यास गेलो तर ते दोन दिवसा थांबा मी कारवाई करतो असे म्हणत टोलवाटोलवी केली. परंतू पुढील चार दिवसात कारवाई झाली नाही तर न्याय मिळविण्यासाठी व मुक्या प्राण्यासाठी, जनतेसाठी लोकशाही पध्दतीने आपण दि. 1 जून 2020 रोजी खडकेश्वर ताडहादगांव लघु पाटबंधार्यामध्ये अमरण उपोषण करणार आहे. उपोषणा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असेही शेवटी या निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment