शंकर गिरी, सारेगमप फेम अंजली गायकवाड, पराग चौधरी सहभाग नोंदविणार 

जालना । वार्ताहर

कोरोना या वैश्‍विक महामारीच्या आपत्तीमुळे संपूर्ण जग स्तब्ध आहे. घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी आता सत्संग  सोहळा परिणामकारक ठरत आहे. शहरातील युवा भागवताचार्य अजिंक्य महाराज देशमुख यांनी फेसबुक पेजवरून जिह्यासह परजिल्ह्यातील नामवंत संत, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, युवा कलाकार  यांचा सोहळा आयोजित करून ऑनलाइन भक्तिमार्ग सुरू केला आहे. या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी सहभाग नोंदविला. 

3 जून रोजी संगीत अलंकार शंकर गिरी,  4 जून रोजी सारेगमप फेम अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड व त्यांचे वडील अंगद गायकवाड कला सादर करतील तर 5 जून रोजी पंडित पराग चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. ज्येष्ठ प्रवचनकरासोबतच युवकांनाही या व्यासपीठाद्वारे आपली कला सादर  करण्याची परवानगी मिळाली आहे. आहे. यात प्रामुख प्रवचन, कीर्तन, प्रबोधन, तबलावादन, पखवाज वादन, बासरी, महिला मंडळची भजने सादर केली जात आहेत. या सोहळ्यासाठी डॉ. प्रसाद चौधरी, दुर्गा संगीत साधनाचे गजानन गोंदीकर, युवा भागवतकार अजिंक्य महाराज, प्रशांत जाधव हे परिश्रम घेत आहेत. 

फेसबुक लाईव्हचा उपयोग 

दररोज साडेचार ते साडेपाच या वेळेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गत पंधरा दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. सुमारे एक ते दीड हजार नागरिक याचा लाभ घेत आहेत.- अजिंक्यमहाराज देशमुख.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.