जालना । वार्ताहर

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना व बदनापुर तालुक्यातील एकुण 15 कोव्हीड केअर सेंटरच्या नोडल अधिकारी, प्रमुख व्यवस्थापकाची कोव्हीड केअर सेंटरमधील सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यता आलेल्या बैठकीत घेतला.

या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, संपर्क अधिकारी डॉ. संतोष कडले, तहसिलदार जालना श्रीकांत भुजबळ, तहसिलदार बदनापुर संतोष बनकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयातील नियुक्त डॉक्टरांनी कोव्हीड केअर सेंटरमधील रुग्णांची नियमितपणे तपासणी करावी. कोव्हीड केअर सेंटरमधील भरती असलेल्या सहवाशीतांची भोजन, निवासाची चोख व्यवस्था करण्यात यावी.  परिसरामध्ये स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच रुग्णांची असुविधा होत आहे अशी तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.