जालना । वार्ताहर

कोरोना आजाराच्या महाभयंकर परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणार्‍यांना समाजातील काही लोकांकडून त्यांचा छळ होत असल्यामुळे खाजगी हॉस्पीटलची सेवा खंडीत होऊन इतर आजाराचे रूग्ण मृत्यूच्या जाळ्यात उभे ठाकले आहे. समाजातील सर्व बाधवांनी पोलीस व वैद्यकीय सेवा देणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन शहरातील मान्यवरांनी केले आहे. 

कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना या काळात सेवा देणारे पोलीस व वैद्यकीय सेवेतील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनाही सेवेच्या दरम्यान कोरोना आजाराची लागवण झाली आहे. जालना जिल्ह्यातील एकुण बाधित रूग्णांपैकी 50 ते 60 रूग्ण हे सेवेतील कर्मचारी आहेत. ज्या ठिकाणी हे लोक राहतात. त्या ठिकाणचे व परिसरातील नागरीक त्यांच्याशी दुजाभावाची वागणूक देऊन त्यांचा छळ करीत असतांना दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्यांनी आपला व आपल्या कुटूंबाचा जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांची सेवा केली आणि ते बाधीत झाले अशा लोकांची प्रशंसा व कौतूक केले तरी कमी आहे. परंतू त्या ठिकाणी या ठिकाणी उलट आहे. हे मात्र माणूसकीला अजीबात पटणारे नाही. वैद्यकीय सेवेतील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांना समाजाकडून अपमानजनक वागणुक मिळत असल्यामुळे या लोकांनी खाजगी हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय सेवा खंडीत केल्यामुळे इतर आजाराच्या रूग्णाच्या आजारामध्ये वाढ होऊन ते मृत्यूच्या उमरठ्यावर आहे. काही रूग्णांना तातडीची सेवा उपलब्ध होऊ न शकल्यामुळे त्यांचा आजार बळावत आहे. याची जाणीव ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी बरोबर कर्तव्य देखील असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भातील डॉ. संजय राख यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील जनता व समाजीक कार्यकर्ते खडबडून जागे झाले. आणि याबाबतीची जागृकता गतीमान झाली आहे. वैद्यकीय सेवा देणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विलास नाईक, अ‍ॅड. सुनिल किनगावकर, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, व्यापारी महासंघाचे विनीत सहानी, गटनेते गणेश राऊत, अब्दुल मुजीब, सय्यद जमिल रिजवी, बाला परदेशी, बदर चाऊस, अहेमद नुर, मोहन इंगळे, डॉ. विशाल धानुरे, नगरसेवक विनोद रत्नपारखे, संजय भगत, आरेफखान, अरून मगरे, निखील पगारे आदींनी केले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.