मंठा । वार्ताहर
कोरोना पार्श्वभूमी मंठा तालुक्यातील हेलस येथील संभाजी ब्रिगेडच्या व तरुण मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 35 जणांनी रक्तदान केले.
जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजी ब्रिगेड शाखा हेलस व तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने कोरोना संसर्गाच्या च्या पार्श्वभूमीवर जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषक सोहळा व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एक रक्तदान शिबिर आयोजित करून वेगळा कार्यक्रम घेण्यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा मधील मधील रक्तदात्यांना पोलीस निरीक्षक विलास निकम सरपंच परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हेलस ते सरपंच पांडुरंग खराबे दीपक खराबे आरोग्य विभागाचे देशमुख ग्राम विस्तार अधिकारी नंदकुमार घनवट यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी रक्तदान केले असून या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी आकाश खेत्रे राम खराबे विठ्ठल खरावे सोपान खराबे दिगंबर खराबे उद्धव खराबे विलास खराबे शिवाजी बनसोडे सोहेल पटेल अमर खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a comment