मनसेचे जिल्हाध्यक्ष सोळंके यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जालना । वार्ताहर
परतुर-मंठा तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्याच्या मालकांने 2600 रुपये भाव जाहीर केल्याप्रमाणे शेतकर्याला बिल दिले नसून त्या ऐवजी 2 हजार रुपये बिल दिले. परंतु उर्वरीत सहाशे रूपये उसाचे बिल 10 जुन पर्यंत द्यावेत अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे एका निवेदना द्वारे केले आहे.
निवेदनात असे ही म्हटले आपल्या निदर्शनास आणुन देतो की.जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा तालुक्यातील प्रायव्हेट लिमिटेड बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकर्यांचे थकित बिल देण्या बाबत दि.4 रोजी मुख्यमंत्री कार्यालयास निवेदनाद्वारे ऊस उत्पादक शेतकर्यांचे थकित बिल देण्या बाबत विनंती केली होती. परंतु दि.29 आज पर्यंत कारखान्याच्या मालकाने जाहीर केल्या प्रमाणे भाव दिला असुन,मात्र जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण उसाचे बिल शेतकर्यांना मिळाले नाहीत.हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.त्यात कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे व मागच्या 77 दिवसात सतत चार वेळा वादळी वार्यासह गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आला आहे. म्हणून परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे शेतकर्यांची सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याली आहे.
जालना जिल्ह्यातील. परतुर-मंठा तालुक्यातील येथील प्रावेट लिमीटेड बागेश्वरी साखर कारखाना मालकाने जाहीर केल्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकर्यांना 2600 प्रति टन भाव जाहीर केला होता.परंतु प्रत्यक्षात ऊस उत्पादक शेतकर्यांना फक्त 2000 रुपये प्रमाणे बिल दिले आहे. बाकी थकित 600 रु प्रत्यक्षात परतुर-मंठा तालुक्यातील शेतकर्यांना बागेश्वरी कारखान्याच्या मालकांने ऊस उत्पादक शेतकर्यांच्या समोर 2600 रुपये जाहीर केल्या प्रमाणे उसाचे बिल द्यायला पाहिजे होते. परंतु दिले नाही.हा साखर कारखानदार ऊस उधारीवर का घेतो?कारण ऊस उत्पादक शेतकरी ज्या वेळेस उसाची लागवड करतो त्या वेळी त्याला नांगरणी.उसाचे बेणे लागवड.अंतर्गत मशागत. 11 महिने पाणी देणे.वेळो वेळी रासायनिक खते द्यावी लागतात. प्रसंगी 1/2 फवारण्या कराव्या लागतात. नियोजन करून नगदी खिसातुन खर्च करावा लागते.म्हणून 2020 ते 2021 वार्षिक वर्षासाठी शेतकर्यांचा ऊस कारखानदारांनी उधारीवर घेऊ नये असा प्रकारे. परिपत्रक काढून शेतकर्यांना दिलासा द्यावा.तसेच अशा कठिण प्रसंगी जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे थकित बिल 600 रुपये देण्या बाबत.मा साखर आयुक्त यांना सूचना देऊ बागेश्वरी साखर कारखान्याच्या मलकावर कारवाई होईल हि अपेक्षा आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची साखर कारखानदार अडवणुक करीत आहे.मागच्या 77 दिवसात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस गारपीट झाल्या होती. या बागेश्वरी साखर कारखान्याच्या मलकावर शेतकर्यांचे थकित 600 रुपये बिल दिले नाही. व ऊस उधार घेऊन शेतकर्यांची फसवणूक केली.तसेत ऊस उत्पादक शेतकर्यांना विनाकारण मुदाम 600 रुपये अडकुन ठेवल्या प्रकरणी कारवाई करावी.व हे संकट लक्षात घेऊन शेतकर्यांचे थकित 600 रुपये बिल 10 जुन परेंत देण्यात यावे.
Leave a comment