कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यात ता. 30 मे रोजी सिटू कामगार संघटनेचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन ठिक ठिकाणी साजरा देशभर आज लॉक डाउनचे नियम पळून साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील विविध ठिकाणी सिटू संघटनेच्या कामगार व कर्मचारी सभासदांनी आपल्या कुटुंबासह तर काही गावात शारीरिक अंतर ठेवून चार पाच जण एकत्र येऊनसंघटनेच झेंडा व फलक हातात घेऊन साजरा केला व सिटू ला अभिवादन केले
सिटू ही देशपातळीवरील कामगार कष्टकर्यांच्या न्याय हक्कसाठी सातत्याने लढणारी एक मिठी लढाऊ कामगार संघटना आहे कोलकाता येथे सितूच्या पाहिले राष्ट्रीय अधिवेशन होऊन 30 मे 1970 मध्ये सिटू ची स्थापना झाली आज रोजी सिटू संघटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.सिटू च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा हा सांगता दिन सुद्धा आहे.हा 50 वर्षाचा सितूच्या इतिहास हा संघर्षमय राहिला आहे कामगारांच्या अनेक न्याय मागण्यासाठी हजारो आंदोलने या संघटनेने केली आहेत सरकारला अनेक कामगार कायदे करायला भाग पाडलेले आहेत. सध्या मोदी सरकार 44 कामगार कायदे रद्द करून फक्त 4 कामगार संहिता आणत आहे अनेक राज्यात आठ तासावरून कामाचे तास 12 केले जात आहे चुकीच्या धोरणामुळे प्रचंड बेटोजगरी वाढलेली आहे कोरून काळात स्थलांतरित मजुरांची खूप हाल झाले आहे या सर्व प्रश्नावर सिटू संघर्ष करत आहे. जालना जिल्ह्यतीलही वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटित असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अण्णा सावंत,मधुकर मोकळे व कॉम्रेड गोविंद आर्द्ड यांच्या नेतृधसिटू संघटनेचे चालू आहे.
Leave a comment