औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 976 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 453 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 39 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1498 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यू वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (3), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1), संजय नगर (1), मुजिब कॉलनी, रोशन गेट (1), कटकट गेट, नेहरू नगर (1), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी, गल्ली नं.बारा (1), मिसरवाडी (1), समता नगर (1), एन आठ, सिडको (1), वैजापूर (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 16 महिला आणि 23 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 976 जण कोरोनामुक्त
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 02, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 10 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. तर मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 976 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
69 कोरोनाबाधितांचा मृत्यू
आतापर्यंत घाटीत 58, खासगी रुग्णालयात 10, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 69 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
Leave a comment