खुलताबाद । वार्ताहर
खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगी परिसरात 5 ते 6 तास वीज गुल झाली असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द केल्याचा राग आल्याने बाजार सांवगी येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने पोलीसात खोटी तक्रार केली आहे. संबंधीत महावितरण सहय्यक अभियंत्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने खुलताबादचे तहसीलदार , पोलीस निरिक्षक, उपविभागीय अभियंता महावितरण यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे , प्रश्न मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्यच आहे. खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगी येथे गेल्या अनेक दिवसापासून वीजेचा लंपडाव सातत्याने सुरू असून .याबाबत महावितरण कंपनीकडून दरवेळी वेगवेगळी कारणे दिली जातात. तक्रारीची दखल घेतली जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसात वीज गुल होत असल्याने नागरिकांनी लेखी तक्रार ही केली आहे. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रात बातम्याही प्रसिध्द झाल्या . या बातम्यामुळे महावितरणची बदनामी झाल्याचे नमूद करीत बाजारसांवगीचे अभियंता प्रदीप काळे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागरिकांच्या अडीअडचणी तक्रारी वृत्तपत्रात येवूच नये यासाठी पत्रकाराविरूध्द खोट्या तक्रारी पोलीसात देवून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न महावितरणच अभियंते करत आहे. पत्रकार अशाखोट्या तक्रारीला घाबरणार नाही. महावितरणचे अभियंता प्रदीप माणिकराव काळे यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी खुलताबाद पत्रकार सेवासंघाच्या वतीने यांनी तहसीलदार राहुल गायकवाड , पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे , उपविभागीय अभियंता महावितरण यांनी दिले आहे. यावेळी पत्रकार वसता शिरसाट गल्लेबोरगावकर, मूक्ततार सय्यद, अण्णा जाधव, गणेश मूराडे, संतोष करपे, बशीर शेख, मछिंद्र घोरपडे, सलमान खान, ईसाक कूरेशी, भिकन शाहा, आजिनाथ बारगळ, नईम शहा, अमिन भाई, आदी पत्रकार उपस्थित होते.
Leave a comment