औरंगाबाद । वार्ताहर
जिन्सी परिसरातील व्हीआयपी फंक्शन हॉलजवल एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न शुक्रवारी मध्यरात्री झाला. माहिती मिकताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.
जिन्सी भागातील व्हीआयपी फंक्शन हॉल येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. त्यामध्ये रात्रीच्या सुमारास तीन जण एटीएम मध्ये नागरिकांना दिसले सुरुवातीला ते पैसे काढत असतील असे वाटले, मात्र तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या हातात दोन लोखंडी रॉड होते. त्याच्या साहाय्याने ते चोरटे एटीएम मशीन फोडत असल्याचे नागरिकांना दिसले. हे पाहताच नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. नागरिक आपल्या जवळ येत असल्याचे दिसताच तिन्ही चोरटे पळून गेले. त्यानंतर या बाबत पोलिसांना माहिती देताच गुन्हे शाखेचे एपीआय अजबसिंग जारवाल, एपीआय शिंदे, हवलंदार राजेंद्र साळुंखे,सह जिन्सी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा पर्यंत प्रत्यक्षदर्शी नागरिकाकडून चोरट्यांच्या वर्णनाच्या माहिती आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते.या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Leave a comment