औरंगाबाद । वार्ताहर
लॉकडाउनच्या काळात जसे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत तसेच तृतीयपंथी समाजातील नागरिक ही अडचणीत आहे. ही अडचण शिवसेना जिल्हाप्रमुख यांना महिला आघाडीच्या प्रमुख दुर्गाताई भाटी यांनी आमदार दानवे कानावर घातली. सदरील बहुतांश कुटूंब हे गादियाविहार तुळजाई नगर भागात राहतात.
ही माहिती मिळताच आमदार अंबादास दानवे स्वतः त्या भागात गेले. त्यांनी त्या ठिकाणी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर संगटक राजुभाऊ वैद्य,महिला आघाडीच्या संघटक दुर्गाताई भाटी,काँग्रेस पक्षाचे सय्यद अक्रम,उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, अनिल मूळे, विभागप्रमुख नंदू लबडे,शाखाप्रमुख मोहन तिरछे, महेश गायकवाड, गणेश बनकर, मनोज जोगदंड, संतोष कांदे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment