गावकर्यांच्या मदतीने महसुल विभागाने दोन ट्रक्टर पकडले
बोरगांव बाजार । वार्ताहर
सावखेडा ता.सिल्लोड येथील पुर्णानदीपाञात अवैध वाळु उपसा करत असताना गावकर्यांच्या मदतीने महसुल विभागाने दोन ट्रक्टर पकडुन पुढील कार्यवाही साठी मुद्देमालासह सिल्लोड तहसील येथे जमा केले, सावखेडा ता.सिल्लोड येथील पुर्णानदी पाञात पदम किसन लोदवाळ रा. लोदवाळवाडी यांचे ट्रकर शरद गणपत भोजणे रा.सावखेडा यांचे ट्रक्टर हे दिनांक 29 रोजी मध्यराञी पुर्णा नदीपाञात वाळु भरत असताना काही गावकर्यांच्या निर्दशनात आले आसता यावेळी गावकर्यांनी दोन्ही ट्रक्टर पकडुन महसुल विभागाला कळविले.
यानतंर लगेच सकाळी विभाग मंडळ अधिकारी गणपत दांडगे, बोरगांव बाजार तलाठी विष्णु पवार,लोणवाडी तलाठी गिरीष झाल्डे,कोटनांद्रा तलाठी इंगळे यांनी सावखेडा येथे येऊन ट्रक्टरसह मुद्देमालाचा पंचनामा करुन पुढील कार्यवाहीसाठी ट्रक्टर सिल्लोड तहसील कार्यालय येथे जमा केले. या प्रकरणात गावकर्यांनी मुद्देमालासह ट्रक्टर पकडुन महसुल विभागाला मोठे सहकार्य केले आहे व सदरील वाळुचोरी करणारावर (तहसील) महसुल विभागाकडुन कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्व गावकर्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment