सोयगाव । वार्ताहर
ट्रॅक्टरने नांगरटी करतांना ट्रॅक्टर विहीरीत पडल्याने पाण्यात ट्रॅक्टरखाली दाबल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची दुःखत घटना गुरुवारी दि.28 मध्यरात्री सोयगाव तालुक्यातील  गोंदेगाव येथे घडली. सागर चिंतामण देसले वय. 24 असे तरुणाचे नाव आहे. 

लॉकडाऊचा फटका बसल्याने रोजगार हिरावलेल्या गोंदेगाव येथील सागर गावी परतला आणि ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत कुटुंबास हातभार लावीत होता. गुरुवारी सायंकाळी नऊ वाजता जेवण आटोपून मुखेड शिवारातील गट क्रमांक 91 मधील सुभाष बोरसे यांच्या शेताची नांगरटी करण्याकरीता गेला रात्रभर नांगरटी करत असतांना पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर मागे घेत असतांना पन्नास फुट खोल विहीरीत ट्रॅक्टर जाऊन पडले यात विहीरीत असलेली पाणी आणि ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सागर दाबला जाऊन पाण्यात बुडून गुदमरल्याने त्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी घटनेची माहीती बनोटी दुरक्षेत्रात मिळाल्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली ठाणे अंमलदार योगेश झाल्टे, सतीश पाटील, दिपक पाटील, विकास दुबीले यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनाकरीता बनोटी येथील प्राथमीक आरोग्य केद्रात आणल्यावर आरोग्य अधिकारी डॉ. घावटे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घरची आठवण परिस्थिती हलाखीची असल्याने सागर सुरत येथील एका कारखान्यात कामाला होता परंतु कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे नौकरी जाऊन बेरोजगार झाला आणि मागील आठवडयात गावी परतला होता. घरी रिकामे बसण्यापेक्षा ट्रॅक्टर चालविता येत असल्याने गावातील शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा चालक म्हणून काम करुन लागला. सकाळची सागर झोपेची वेळ शेतकरी आणि बरोबर आलेला चालक झोपी गेल्याने सागर ने काम चालूच ठेवले होते नांगरटी अंतिम टप्प्यात असतांनाच शेतातील विहीर दिसली नाही आणि ट्रॅक्टर मागे घेताना विहीरीत जाऊन पडले. चोवीस वर्षीय सागर बद्दल आई वडीलांनी पाहीलेल्या लग्नाच्या स्वप्नाच्या आधिच मृत्यू ओढविल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.