बोरगाव बाजार । वार्ताहर
सावखेडा ता.सिल्लोड येथील सेवानिवृत्ती शिक्षक नामदेवराव संपतराव शेळके यांनी आपले एकमहीन्याचे निवृत्तीवेतन मुख्यमंञी साह्याता निधीत मदत म्हणुन दिले. सर्व जगामध्ये कोरोनाच्या भयंकर महामारीने हाहाकार माजवला आहे,व सर्व जगया महामारीचा मोठ्या ध्येयर्यांने सामना करत आहे,या संकटकाळी अनेक सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ती आपआपल्या परीने या महामारीच्या पार्शभुमावर आपल्याकडुन खारीचा वाटा म्हणुन शासनाला मदत करत आहे.
याचाच भाग म्हणुन सावखेडा येथील जेष्ठ निवृत्त शिक्षक नामदेवराव संपतराव शेळकेयांनी आपल्या स्वच्छेने आपले एका महीन्याचे निवृत्ती वेतन रुपये 30000/- तीस हजार रुपये मुख्यमंञी साह्यता निधी फडामध्ये दिले, नामदेवराव शेळके हे बोरगांव बाजार येथील जवाहर विद्यालय या संस्थेत सहशिक्षक पदावर होते, व ते 20 वीस वर्षापुर्वी निवृत्त झाले होते,त्यांनी या अगोदर किल्लारीमध्ये झालेल्या भयकंर भूकंपात तसेच नेपाळ भूकंपाच्या वेळी शेळके यांनी खरीचा वाटा म्हणून काही आर्थिक मदत केलेली होती, व अशा राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी प्रत्येक व्यक्तीनी गरजू व्यक्ती साठी आपल्या परीने पसायदान करायला हवे असे त्यांचे मत आहे.
Leave a comment