गावच्या विकास कामात पारर्दशकता व सुसूत्रता नाही
बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव बाजार ता.सिल्लोड परिसरातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसभा,व पालकांतुन विविध समित्याची निवड एक ते पाच वर्षासाठी करण्यात येत असते,माञ या निवड झालेल्या सर्व समित्याची निवड फक्त कागदावरच झालेली दिसुन येते, शासनाने गावच्या विकास कामात पारर्दशकता व सुसूञता आणण्यासाठी गाव पातळीवर विविध प्रकारच्या समित्याची स्थापना केली आहे,दर एक किवा पाच वर्षानी या समितीची ग्रामसभेतुन किवा पालकांच्या उपस्थितीत निवड करण्यात येत असते, बोरगांव बाजार,बोरगांव सारवाणी,सावखेडा, डोईफोडा,म्हसला,कोटनांद्रा,दे
अशा अनेक समित्याची नेमणुका या ग्रामपंचायती किंवा ग्रामसभेतुन,शालेय स्तरावरुन पालकांतुन करण्यात येत असतात,यासर्व समित्या अतिमहत्वाच्या आहे, यामध्ये अनेक वेळा समिती निवडीवरुन छोटे-मोठे तंटे ऐकायला मिळतात,या सर्व समित्याची आपली भुमिका कामे व्यवस्थित पार पाडलीतर गावामध्ये सर्व स्तरा पर्यत होणार्यां विकासला कोन्ही रोखनार नाही,व भ्रष्टाचाराला आळा बसत आसतो ह या सर्व समित्याचे काम असतात,पण विविध समितीत निवड झालेल्या सदस्याना आपल्या आधिकाराची माहीती नसल्याने व निरउत्साह अभाव असल्यामुळे या समित्या कुचकामी ठरत आहे,असेच काही चिञ बोरगांव बाजारसह परिसरातील सर्व गावातील समित्याच्या बाबतीत तंतोतत खरे ठरले आहे,याची निवड फक्त कागदावरच करण्यात आली असल्याचे दिसुन येते यामुळे सबंधीत सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकासह असे भ्रष्टाचार करणाराना आपले मनमानी कारभार करण्यासाठी चांगलेच रान मोकळे झालेले दिसुन येते,यामध्ये लाखो रुपयाचा बोगस कामे करुन संबधीत हजारोचे घोटाळे करुन मलीदा खाऊन मोकळे होतात,तरी सुध्दा अनेक गावकर्यांना समितीमध्ये आपली निवड झालेली आहे या कल्पना सुध्दा राहत नाही, यानिवड प्रक्रियेकडे सरकारी आधिकारी व लोकप्रतिनीधी सुध्दा लक्ष द्यायला तयार नाही हे विशेष म्हणाव लागेल.
Leave a comment