पती-पत्नीविरुद्ध विशेष पथकाची घेतले ताब्यात
जालना । वार्ताहर
अतिरिक्त औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या चंदनझिरा येथील हातभट्टी दारूच्या आडया वर विशेष पथकाने धाड टाकून 57 हजार पाचशे रुपयाच्या दारू सह तलवार जप्त केल्याचा घटना आज घडली आहे.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की चंदणझिरा येथील रहिवासी अस्लरले लालूप्रसाद सुदाम जाधव आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर दारूबंदी विशेष पथकाने आज सकाळी धाड टाकली.यावेळी गावठी दारूच्या अड्ड्याची व घराची झाडाझडती घेत असताना त्याठिकाणी दोन तलवारी आढळून आल्या.या धारदार तलवारीसह सुमारे 57 हजार 500 रुपयांची गावठी दारू व रसायन जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, सुभाष पवार, सुरेश राठोड, राजेंद्र वेलदोडे, राम पव्हरे, यशवंत मुंढे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, सर्जेराव हिवाळे, अलका केंद्रे, रत्नमाला एडके, चालक दीपक अंभोरे यांनी परिश्रम घेतले आहेत.
Leave a comment