बदनापूर । वार्ताहर
कोरोना मुक्त असलेल्या बदनापूर तालुक्यात कोरोना शिरकाव झाल्याचे गुरुवारी स्प्ष्ट झाले असून बदनापूर शहरातील दोन व्यापार्यांना कोरोना लागण झाल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या असून कोरोनाग्रस्त ठरलेल्या बाजारगल्ली व शिवाजी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत सील करण्यात आलेल्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविका पीपीई किट धारण करून या आरोग्य तपासणी टिमणे जवळपास 500नागरीकाची तपासणी करण्यात आली.
शहर व परिसरातील कोरोणा परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके डॉ. जे.जी. कुंडकर तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री सुदेश वाटोरेे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्त्या गटप्रवर्तक आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक आरोग्य सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या दहा टीम बनवून बदनापूर शहरात घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी योगेश सोळंके, डॉक्टर जे जे कुंडकर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री सुदेश वाठोरे, आरोग्य सहाय्यक देशपांडे ,परदेशी, दाभाडकर, श्रीमती घुगे, ए.बी.शिर्के, के.सी.डोंगरे या परिस्थितीचा बारकाईने व काळजी घेऊन लक्ष पूर्वक लक्ष देऊन आहेत. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून 29 मे रोजी पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर,मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,कोविड 19 अधिकारी गणेश ठुबे यांनी आरोग्य विभागाला सील केलेल्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणे अत्यन्त आवश्यक असल्याने तातडीने तपासणी करण्याची विनंति केली असता आरोग्यसेविकांचे पथक पीपीई किट धारण करून सील केलेल्या भागात दाखल झले व 500 नागरिकांची आरोग्य तपासणी केली त्यामुळे शहरातील इतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Leave a comment