कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे ता. 29 शुक्रवार रोजी बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता 28 मे गुरुवार रोजी मध्यरात्रीपासून ते 31 मे च्या रात्री बारापर्यंत संचार बंदीचे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी काढले असून कोरोनारणा विषाणूचा र्लेींळव-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी आदेशाचे पालन कुंभार पिंपळगाव होताना दिसून येत आहे शुक्रवारी रस्ते निर्मनुष्य झाली होती .
बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता घनसावंगी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या गावात शंभर टक्के संचार बंदीचे आदेश पाळण्यात आले घनसावंगी पोलीस ठाण्याचे ए पीआय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभार पिंपळगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे ,पोलीस कॉन्स्टेबल रामदास केंद्रे , पोलीस कॉन्स्टेबल शाम देवडे ,पोलीस कॉन्स्टेबल ए.पी बिक्कड आदी सह पोलिस कर्मचार्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता अत्यावश्यक सेवा हास्पीटल ,औषधी दुकाने वगळता सर्व व्यवसायिकांनी आप-आपली प्रतिष्ठाने तीन दिवस शंभर टक्के बंद राहून सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कुंभार पिंपळगाव येथील मुख्य बाजारपेठेत असा संचारबंदी च्या काळात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
Leave a comment