भोकरदन । वार्ताहर
सोशल मीडिया फेसबुकवर महापुरुषाची बदनामी करणारी पोस्ट टाकून भावना दुखवल्या असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी एका तक्रारी निवेदनाद्वारे भोकरदन पोलिसांकडे करण्यात आली आहे. भोकरदन येथील सय्यद फेराज सिराजोद्दीन याने स्वा. सावरकर यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर लिखाण केले त्यामुळे सावरकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. महापुरुषांची बदनामी करून त्यांची प्रतिमा मालिन करण्याच्या उद्देशाने पोस्ट केल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने , गजानन तांदुळजे , रितेश देशपांडे , गजानन शास्त्री , राम कुलकर्णी , शेषराव तळेकर , रवींद्र सासमकर , ऋषिकेश देशपांडे , प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते.
Leave a comment