कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
पंच दशनाम जुना आखाडा मढी चार (4) गुरुस्थान गिरनार पर्वत गुजरात सध्या हल्ली मुक्काम भादली तालुका घनसावंगी जिल्हा जालना वय 128 श्री महंत चंद्रशेखर भारती गिरी बाबा (महाराज) तालुक्यात 128 वर्षांचे महापुरूष यांचे ता. 29 शुक्रवार रोजी त्यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. सायंकाळी 5 वाजता भादली येथे त्यांचा समाधीष्ठांनचा कार्यक्रम परिसरातील गुरूवर्य ,महंत ,महाराज ,सांपार्दाय भंजनी मंडळ , सर्व शिष्यवर्ग ,सर्व भाविक,गावकरी यांच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंगने संपन्न झाला.
भारती बाबा जाण्याने परिसरातील श्रध्दास्थान हरवले आसल्याच्या दुख:त भावना व्याक्त करण्यात आल्या. महाराजांनी वेगवेगळे अनुष्ठान केलेले आहे पूर्ण चातुर्मास पाण्यात राहून अनुष्ठान ,समाधिस्थ एक महिना राहून अधिष्ठान ,लिंबाच्या रसावर एक महिना राहून अनुष्ठान, अशाप्रकारची वेगवेगळे अनुष्ठान त्यांनी केले आहे ब्रह्मचारी /संन्याशी श्री महंत चंद्रशेखर भारती गिरी बाबा ( महाराज) यांनी पूर्ण आयुष्य धर्म सेवा केली.
Leave a comment