पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आज दिनांक 29 रोजी सकाळी नऊ वाजता स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना तांदूळ व डाळीचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ या पध्दतीने वाटप करण्यात आले. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब असलेल्या कार्डधारकांना कोरोणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांना प्रतिमांणसी पाच किलो तांदूळ व आता त्या सोबत प्रति कार्डधारकांना तुरडाळ किंवा हरबरा दोन्ही पैकी कोणतिही 1किलो डाळ लाभार्थ्यांना देण्यात यावे असा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता्.त्या अनुषंगाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कार्डधारकांना आज स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शांततेत धान्याचे वितरण करण्यात आले .एप्रिल आणि मे महिन्याची डाळ एकत्र देण्याचा विचार होता मात्र धान्यसाठा उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना एप्रिल महिन्याची डाळ मे मधे देण्यात आली आहे आणि मे -जून या दोन महिन्याची डाळ जून मध्ये एकत्रीत वाटप करण्यात येईल.त्या बद्दल कोणतीही शंका बाळगु नयेतालुका पुरवठा अधिकारी भोकरदन पी.बी.पपुलवार
Leave a comment