हजाराचे पॅकेज तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावे!
अॅड.विलासबापू खरात यांची आग्रही मागणी
जालना । वार्ताहर
बँकांचे कर्ज घेऊन नियमीतपणे इमाने इतबारे कर्ज फेड करणार्या शेतकर्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने अशा शेतकर्यांसाठी पन्नास हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले मात्र सदरची रक्कम अद्यापही त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली नाही. जाहीर करण्यात आलेली पॅकेजची ही रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार ऍड. विलासबापू खरात यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात ऍड. खरात यांनी म्हटले आहे की, कर्जबाजारी शेतकर्यांसाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा करुन ती अंमलात देखील आणली. परंतू याचवेळी जे शेतकरी नियमीतपणे कर्ज फेडतात त्यांच्यावर देखील अन्याय होऊ नये म्हणून राज्य शासनाने अशा शेतकर्यांसाठी पन्नास हजाराच्या पॅकेजची घोषणा केली होती. या घोषणेला आता अनेक महिने उलटल्यानंतर देखील सरकारने नियमीत कर्जफेड करणार्या शेतकर्यांसाठी घोषीत केलेले पन्नास हजार रुपयांचे पँकेज त्यांच्या खात्यावर जमा केलेले नाही. सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराची साथ आणि त्यातच खरीपाची तयारी शेतकर्यांना करावी लागत आहे. येत्या हंगामातील बि- बियाणे, खते, किटक नाशके आदी अनेक कामांसाठी शेतकर्यांना पैशाची खास करुन गरज आहे. शासनाने सदरची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा केली तर अशा शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असून अत्यंत अडचणीच्या काळात त्यांना हा पैसा वापरायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरुन तातडीने प्रयत्न करुन सदरची रक्कम ही नियमीत कर्जफेड करणार्या शेतकर्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी, अशी विनंतीही ऍड.विलासबापू खरात यांनी जिल्हाधिकार्यांकडे या निवेदनाच्या शेवटी केली आहे.
Leave a comment