प्रेस ऑफ कॉन्सिलच्या मागणीला प्रेस क्लब जालन्याचा जाहिर पाठींबा 

जालना । वार्ताहर

कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे वृत्तपत्र मालक/प्रकाशक/संपादक यांना मोठे आर्थीक नुकसान सहन करावा लागत आहे. ज्याचा विपरीत परिणाम पुढच्या दोन वर्षापर्यंत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वृत्तपत्राला शासनाने 30 हजार चौरस सें. मी. जाहिरातीच्या स्वरूपात आर्थीक पॅकेज प्रदान करावे अशी मागणी प्रेस ऑफ कॉन्सिल महाराष्ट्र मुंबई यांनी शासन दरबारी केल्याने ही मागणी योग्य असून या मागणीला जालना प्रेस क्लबच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला. 

सध्या जिल्हा बंदीमुळे पेपर रोल, रिम, प्लेट, शाही रसायन उपलब्ध होत नसल्यामुळे सर्व वृत्तपत्र बंद पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थीक नुकसान झाले आहे. तसेच मुद्रण बंद झाल्यामुळे ग्राहक, वाचक, वार्षीक वर्गणीदारापर्यंत वर्तमानपत्र पोहचले जात नाही. वृत्तपत्राचा मोठा महसुल बुडला आहे. तरी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांनी संबंधीत मागणी  मंजुर करावी कारण ते पण एक संपादक आहे. या पाठींब्याला प्रेस क्लब जालनाचे अध्यक्ष भरत मानकर, कार्याध्यक्षा आयशा खान, सचिव विष्णू कदम, जेष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मकरंद जहागीरदार, अविनाश कव्हळे, पारसनंद यादव, लहु गाढे, महेश बुलगे, दिपक शेळके, भगवान साबळे, संतोष भुतेकर, बद्रीनारायण उपरे, बालाजी अढीयाल, अविनाश मगरे, दशरथ कांबळे, अर्पण गोयल, इलियास भाई, लियाकत भाई, मनोज पटवारी, किशोर शर्मा, विजय खताडे, अंकुश गायकवाड, सुहास कुलकर्णी, संजय भरतीया, सिताराम तुपे, प्रशांत कसबे, सुभाष भालेराव व इतर सर्व पत्रकारांनी या मागणीला पाठींबा जाहिर केला आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.