आर्थिक समृध्द कुटुंबाचे होतेयं कौतुक

परतुर । वार्ताहर

शहरातील प्रतिष्ठित कंत्राटदार मनोहर खालापुरे यांचा मुलगा व वाढोना चे प्रगतशील शेतकरी किसनराव तनपुरे यांच्या मुलीचा विवाह  भाजी नाष्ट्यावर संपन्न झाला. या विवाहाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शहरातील लायन्स क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी तथा प्रतिष्ठित कंत्राटदार मनोहर खालापुरे यांनी आपल्या मुलाचा विवाह गुरुवारी केवळ 40 जणांच्या उपस्थितीत पुरी भाजी च्या नाष्ट्यावर करून आदर्श ठेवला आहे.

या लग्न समारंभात कोरोना नियमांचे पालन करत सॅनेटेरायझिंग ,मास्क,स्क्रिनिंग ,सोशल डिस्टन्स आदींसह आरोग्य तपासणी केली गेली,लग्नात हुंडा, मानपान,आहेर,बँड बाजा,डीजे ,भपकेबाज जेवणावळी ला पूर्ण फाटा दिला गेला, वर वधू कुटूंब सधन परिवारातील आहेत , वर अमित (एमएस्सी ) तर वधू सुनीता (बीएचएमएस) आहेत. केवळ एका तासात सर्व वैवाहिक कार्यक्रम आटोपून झालेला हा विवाह सध्या चर्चेचा विषय आहे.विशेष म्हणजे वरपिता मनोहर खालापुरे यांनी आपल्या मोठ्या मुलाचा विवाह ही भागवत सप्ताहात केला होता. नवीन डॉक्टर सुनेच्या माध्यमातून लायन्स क्लबच्या लायन्स क्लबच्या सहकार्याने गोरगरीब जनतेला सेवा देण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मनोहर खालापुरे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.