परतुर तालुक्यातील चित्र
परतुर । वार्ताहर
तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण जरी आढळले असले तरी परतुर शहरासह अन्य मोठी गावे कोरोना तुन आतापर्यंत तरी वाचली असल्याने त्यातल्या त्यात समाधानाची बाब समजल्या जात आहे.
परतुर शहर हे 40 हजार लोकसंख्या असलेले शहर आहे, शहरातील गाव भाग अत्यंत दाटीवाटीचा व जास्त घनता असलेला असताना शहरात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.जवळच्या शेरोडा गावातील महिला पहिली कोरोना रुग्ण होती,परतुर शहरातील काहींच्या संपर्कात ही महिला आली होती मात्र ते सर्व निगेटीव्ह निष्पन्न झाले होते, तालुक्यातील दुसरा रुग्ण मुंबई तुन रुग्णवाहिकेतून सातोना येथे आलेला होता,तोही परतुर शहरातील काहींच्या संपर्कात आला होता पण ते सर्व निगेटीव्ह निष्पन्न झाले. तर तिसरा रुग्ण तालुक्यातील डोल्हारा येथील महिला आहे. पहिले दोन्ही रुग्ण कोरोना मुक्त झाले तर तिसरी रुग्ण महिला उपचार घेत आहे. डोल्हारा येथील 45 वर्षाची महिला ही त्या महिलेच्या मंठा येथील मुलीच्या संपर्कात आलेली होती,शेरोडा येथील महिलेची हिस्ट्री अज्ञात राहिली तर सातोना येथील 25 वर्षाचा रुग्ण मुबंई तुन आलेला होता. म्हणजेच तीन पैकी दोन रुग्ण हे बाहेरच्या गावातून संसर्ग झालेले होते. दाटीवाटीचं परतुर शहर, त्याखालोखाल दाट घनतेचं आष्टी,व बर्यापैकी लोकसंख्या असलेल्या सातोना,वाटूर,आंबा,आनंदवाडी ही गावे कोरोना तडाख्यातून वाचलेली आहेत. जालना जिल्ह्याने 117 चा आकडा गाठला असला तरी त्या मानाने परतुर तालुका हा 3 वरचं थांबलेला आहे ,याचाच अर्थ तालुक्यातील जनता प्रशासनाला सहकार्य करत स्वतः काळजी घेत आहे असं म्हणायला हरकत नाही.परन्तु त्यासोबत आयपीएस पोलीस अधिकारी श्री.तांबे यांनाही याचे श्रेय जाते.
Leave a comment