तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील सर्व गावकरी व व्यापारी बांधवांना सुचित करण्यात येते कि,महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजारामूळे आपत्कालीन परिस्थिती घोषीत केले आहे. व लॉकडाऊन मर्यादीत वेळे पर्यंत शिथील करण्यात आले. परंतु अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गाव व परिसरातील नागरीक गावामध्ये गर्दी करीत आहेत, त्यामूळे आपल्या गावामध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसुन येत आहे. त्यातचं मौजे खा.हिवरा, व सिध्देश्वर पिंपळगाव येथे कोरोणा बाधीत रुग्ण आढळून आल्याने, व ह्या गावांचा तीर्थपुरीशी व्यापार व बँक व्यवहार संबंधीत संपर्क असल्याने, व आपल्या गावातील नागरिकांचा बाधीत रूग्णांशी संपर्क झाल्या कारणाने त्यांना घनसावंगीला विलगीकरण कक्षात दाखल केल्यामूळे गावकर्यात घबराट निर्माण झाली आहे.
यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी तीर्थपुरी येथील गावकर्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकी मध्ये वैद्यकीय सेवा, मेडिकल व दवाखाने, वगळुन, ईतर सर्व दूकाने/आस्थापना आज दि.29 मे दि.02 जून पर्यंत संपुर्णपणे बंद ठेवण्यात याव्यात असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.तरी, गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी, व परिसरातील खेड्यापाड्यातील व्यक्ती तीर्थपुरीला येण्याचे टाळावे व कोरोना विषाणू विरुद्धच्या निर्णायक लढाई मध्ये प्रशासनास साथ देऊन सहकार्य करावे हि विनंती. ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस प्रशासन,व्यापारी महासंघ,सर्व पदाधिकारी व गावकरी यांनी आवाहन केले आहे.
Leave a comment