कोरोना पाठोपाठ आता टोळधाड संकट शेतकर्यांनी परिस्थितीचे भान ठेवुन दक्षता घेण्याची गरज
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
सध्या भारतासह जगावर कोरोनाचे संकट आहे यातच शेतकर्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येता आहे. पाकिस्तानमधून टोळधाडीने भारतात प्रवेश केला असून मध्यप्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये याचा शिरकाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याचे आवाहन कृषि विभागातील मंडळ कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर दुरगुडे यांचेकडून करण्यात येत आहे.या टोळधाडीच्या तीन अवस्था असतात त्या म्हणजे अंडी, पिल्ले व प्रौढावस्था. मादी 50 ते 100 अंड्याच्या पुंजक्यानी ओलसर रेताड जमिनीत अंडी घालते.
या अंड्यातून बाहेर पडलेली टोळांची पिल्ले एकत्र येऊन वाटेतल्या पिकांचा ङ्गडशा पाडतात. पुर्ण वाढ झालेले पौढ तांबुस रंगाचे असतात, पिकाबरोबर ते झाडांची पाने, ङ्गांद्या, ङ्गुले, ङ्गळे व नवीन ङ्गुटलेली पालवी ङ्गस्त करतात.ही टोळधाड थव्याने एका रात्रीत 100 ते 150 किमी अंतर प्रवास करत असल्याने ती खुपच धोकादायक ठरू शकते.या टोळधाडीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शेतकरी बांधवांनी गट करून रात्री शेतात पहाणी व देखरेख करवी. टोळ एका दिशेने उडत जात असल्याने जमिनीभोवती चर खांदून पिल्लांना अटकाव करता येतो. रात्रीच्या वेळी टोळ झाडावर जमा होत असल्याने टायर किंवा काडीकचरा जाळून धूर केल्याने नियंत्रण करता येते. हे टोळ आढळून आल्यास डबे, पत्रे, ढोल, सायरन वाजवून आवाज करणे. थव्यामध्ये पिल्लांची संख्या जास्त असल्यास प्रतिहेक्टरी 2.5 लिटर निम तेलाची ङ्गवारणी प्रभावी ठरते. टोळाधाड नियंत्रण करण्यासाठी गहु किंवा भाताचे तूस यामध्ये ङ्गिप्रोनिल 5 एसी, 2. 92 ईसी व त्यामध्ये किडीला आकर्षित करण्यासाठी मळी घालून प्रादुर्भावग्रस्त झाडे व शेतामध्ये प्रतिहेक्टरी 20 ते 30 किलो याप्रमाणे ङ्गेकून द्यावे जेणेकरून आमिष खाऊन किड नष्ट होते.तसेच बेन्डिओकार्ब 80 डब्ल्यूपी, क्लोरोपायरीङ्गॉस 20 ईसी, डेल्टामेथ्रीन 2.8 युएलव्ही, मॅलॅथिऑन 50 ईसी या किटकनाशकांची अलीकडेच टोळ नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व तपासणी समितीने शिङ्गारस केली आहे. टोळधाड संकटात शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये. जमिनीभोवती चर खोदणे, काडीकचरा टायर मशाली पेटवून धूर करणे, डबे पत्रे ढोल याद्वारे आवाज करणे, प्रतिहेक्टरी 2.5 लिटर निमतेल ङ्गवारणी, गहू किंवा भात तुस ङ्गिप्रोनिल व मळी या विष अमिषाचा वापर व केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिङ्गारस केलेल्या कीटकनाशकांचीच ङ्गवारणी करावी.ज्ञानेश्वर दुरगुडे मंडळ कृषी अधिकारी धावडा ता.भोकरदन
Leave a comment