साळुबाई वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थांना होमिओपॅथिक औषधांचे मोङ्गत वाटप
जालना । वार्ताहर
धकाधकीच्या जीवनात दिनचर्या बदलली असून अवेळी जेवण, झोप व्यवस्थित न होणे, अशा कारणांमुळे प्रतिकारक शक्ति कमी होत चालली आहे. परिणामी कुठल्याही साथ रोगाचा शरीरात लवकर शिरकाव होतो .साथ रोगाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी सदृढ रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्करराव पाटील दानवे यांनी आज येथे बोलताना केले. जामवाडी ता. जालना येथे कै. साळूबाई भाऊसाहेब वाढेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवारी (ता. 28 ) प्रशांत वाढेकर मिञ मंडळ आणि राजकर आरोग्य धाम यांच्यावतीने 350 ग्रामस्थांना सुरक्षित अंतराचे पालन करून मोङ्गत होमिओपॅथी औषधे वितरित करण्यात आली. रंगनाथ राव पाटील विद्यालयात आयोजित कार्यक्रमात भास्कर राव दानवे बोलत होते.
या वेळी प्रशांत वाढेकर, प्रशांत गाढे, सरपंच रामेश्वर वाढेकर, उपसरपंच संतोष राजकर, भास्कर राव वाढेकर,सतीश वाहुळे,डॉ विठ्ठल राजकर, डॉ. एल. एस. करंडे, अंकुश राव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भास्कर राव दानवे पुढे म्हणाले की, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या महामारीवर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून आयुष मंत्रालयाने निर्गमित केलेल्या आर्सेनिक 30 ही होमिओपॅथिक औषधे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरत असल्याने आईंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रशांत वाढेकर यांनी ग्रामस्थांच्या सदृढ आरोग्यासाठी या उपक्रमातून पाऊल उचलले. ही दिलासा दायक बाब असल्याचे सांगून भास्कर राव दानवे म्हणाले, महापुरुषांच्या जयंती निमित्त मास्क, वडिलांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंतांना किराणा साहित्य, तसेच पायपीट करणार्या परप्रांतीय मजूरांना अन्नछत्राच्या माध्यमातून विसावा व भोजनाची व्यवस्था. असे संकट काळात स्वखर्चाने प्रशांत वाढेकर यांनी राबवलेले उपक्रम गरजवंतांना आधार देणारे असून त्यांचे सेवा कार्य अनेकांना प्रेरणादायी असल्याचे भास्कर राव दानवे यांनी नमूद केले. लप्रशांत वाढेकर यांनी समाज सेवेचा वसा माता - पिता यांच्या कडून प्राप्त झाला असल्याने गावात कोरोना चा ङ्गैलाव होऊ नये यासाठी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण ङ्गवारणी केली असून ग्रामस्थांना साथरोगापासून सुरक्षितता लाभावी यासाठी मोङ्गत औषधे वितरण करण्यात येत असल्याचे प्रशांत वाढेकर यांनी सांगितले. डॉ राजकर व डॉ करंडे यांनी होमिओपॅथी औषधांविषयी माहिती दिली. उपसरपंच संतोष राजकर यांनी सुञसंचालन केले तर सरपंच रामेश्वर वाढेकर यांनी आभार मानले. सुरक्षेच्या नियमांचे पालन करून साडेतीनशे ग्रामस्थांना मोङ्गत औषधे वितरित करण्यात आली. यशस्वी ते साठी. संजय वाढेकर,रावसाहेब वाढेकर,केशव शिंदे,शिवाजी वाढेकर,संदीप जाधव यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment