बदनापूर । वार्ताहर
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून प्रतिकार शक्ती वाढवणार्या आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळयांचे पाथ्रीकर कॅम्पसमध्ये मोङ्गत वाटप करण्यात येणार असून दररोज सकाळी 11 ते 1 येऊन ही औषधी घेऊन जाण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. कोरोना रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून व प्रतिकार शक्ती वाढावी या उद्देशाने भारत सरकारच्या आयुष या आरोग्य विषयक विभागाने आर्सेनिक अल्बम थर्टी या होमियोपॅथिक गोळया उपाशीपोटी खाण्याचा सल्ला दिलेला आहे.
सद्य परिस्थितीत या गोळयांचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या गोळयांचा पुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी बदनापूर तालुक्यातील जनतेसाठी या गोळया मोङ्गत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तालुक्यातील नागरिकांनी बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्प्समध्ये असलेल्या टिव्ंकल स्टार इंग्लीश स्कूल येथे वाटप करण्यात येणार आहे. बदनापूर तालुक्यातील ग्रामीण जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी पाथ्रीकर कॅम्प्स येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत येऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या नोंदवून या गोळया घेऊन जाव्या या गोळया सलग तीन दिवस घ्यावयाच्या असून मोठया माणसांनी 4 गोळया तर लहान मुलांनी (3 वर्षाखालील) 3 गोळया घ्यावयाच्या आहेत. बाजारात या गोळयांचा प्रचंड तुडवडा असतानाही डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी या गोळ्या तालुक्यातील जनतेसाठी उपलब्ध केलेल्या असून प्रथम येणार्यास प्रथम प्राध्यान्य या निकषात हे वाटप होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a comment