जालना । वार्ताहर
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समितीच्या वतीने सावरकरांना अभिवादन आ.कैलास गोरंट्याल यांनी केले हायमॅक्सचे उद्घाटन दि.28 रोजी स्वा.सावरकर जयंती समितीच्या वतीने सावरकर चौकामधे मोजक्याच लोकांमधे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आ.कैलास गोरंट्याल,भाजपा नेते जिल्हा उपाध्यक्ष मा. भास्करराव दानवे,सिद्धीविनायक मुळे,भाजपा गटनेते अशोक अन्ना पांगारकर,रविंद्र देशपांडे,डॉक्टर संजय रूईखेडकर, जगदिश गौड,मनिष नंद,पारस नंद,यांच्यासह सह स्वा.सावरकर जयंती समितीचे अध्यक्ष सतिश अकोलकर,उपाध्यक्ष राहुल यादव,सचिव नारायण भगत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रवींद्र देशपांडे यांनी बोलताना सावरकर प्रेमींच्या मागण्या मांडल्या ज्यात मुक्तेश्वर तलावात स्वा. सावरकरांचे भव्य स्मारक तयार करणे यासह सिंधी बाजार येथील स्मारकाची उंची,पुर्णाकृती पुतळा सुशोभिकरण व हायमॅक्स व्हावे यांचा खास उल्लेख केला. डॉक्टर संजय रूईखेडकर यांनी हायमॅक्स बसविल्याबद्दल मा.कैलास गोरंट्याल यांचे स्वागत केले. मागील वर्षी 26 मे 2019 रोजी सावरकर चौक येथे गत वर्षीचे अध्यक्ष जगदीश गौड़ याच्या नेतृत्वात सावरकर प्रेमींनी लाक्षणिक उपोषण देखील केले होते. त्यापैकी आश्वासन दिल्याप्रमाणे चौकात बसविण्यात आलेल्या हायमॅक्सचे मा.आमदार कैलाश जी गोरंट्याल यांनी कळ दाबुन उद् घाटन केले.लवकरच ईतर मागण्याही मी स्वतः लक्ष घालुन, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना पुर्ण करावयास सांगेन व त्याही निश्चित पुर्ण करू असे आश्वासन दिले.भास्करराव दानवेंनी बोलताना सांगितले की केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्व स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यातुनही मा. अशोक पांगारकर यांच्या माध्यमातून चांगले काम करता येईल. आपण सांगाल त्या पद्धतीने आपण स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी विरेंद्र धोका, संतोष दाणी, भगवान पुराणिक, शिवाजी जोशी,विश्वंभर कुलकर्णी, विक्की आलीझार,संतोष जोशी सर,सोमेश काबलीऐ, ई. उपस्थित होते.यावेळी कोरोना लढाईत 55 दिवस सतत कुटुंबासह कार्य केल्याबद्दल जगदिश गौड यांचाही सत्कार मा. आ.कैलास गोरंट्याल, मा.भास्कर दानवेंनी केला.
Leave a comment