विहामाडंवा । वार्ताहर
विहामाडंवा शिवारातील विहामाडंवा ते हिंगणी रस्त्या लगत चंद्रकांत देशमुख या शेतकर्याच्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला सुख्रुप पणे युवकांनी बाहेर काढुन जीवदान दिले.
याबाबत उन्हामुळे पाण्याच्या तान्हानेने व्याकुळ झाल्याने पाण्याच्या शोधातील हरणाचे पाडस चंद्रकात देशमुख यांच्या विहिरीत पडलेले तेथील महिला कामगार दिसून आले ,त्यानी लगेच जवळ असलेले शंकर पवार , विष्णू मोरे , अमोल भालेकर याना सागताच यांनी मोठे परिश्रम करून पडलेल्या पाडसाला सुख्रुप पणे बाहेर काढले या कालावधीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पन्हाळकर यांनी पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना कळविले त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवताच वनविभागाचे अधिकारी उमेश मार्कड घटना स्थळी आले ,त्याच्या समक्ष हरणाच्या पाडसाला सुरक्षित पणे शेतात सोडून दिले , यावेळी अनिल गाभुड , विठ्ठल बेलुरकर , नितिन ब्रह्मराक्षस आदी उपस्थीत होते हरणाच्या पाडसाला सुख्रुप पणे बाहेर काढून जीवदान दिल्या बद्दल सगळीकडे कौतुक होत आहे.
Leave a comment