29 मे 2020 पासून बियाणे विक्री होणार
विहामाडंवा । वार्ताहर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या वतीने आज खरीप बियाणे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद पैठण रोड शेतकी शाळा परिसर येथे उपलब्ध झाले आहे यामध्ये तूर बिडीएन 711 30 कुंटल प्रति बॅग 6 किलो या प्रमाणे 500 बॅग उपलब्द झाल्या आहेत त्या सोबत मूग बिडीन 2003 02 या 85 बॅग प्रति बॅग 6 किलो त्यानंतर खरीप सुधारित ज्वारी परभणी शक्ती 125 बॅग प्रति बॅग 4 किलो या प्रमाणे विक्री करण्यासाठी उपलब्द झाले आहे.
तरी सर्व आगाऊ नोंदणी करणार्या शेतकरी बांधवाना विनंती करण्यात येते की दि 29 मे पासून सकाळी 9 वाजता बियाणे विक्री सुरू होणार आहे तरी आपण आवश्यक ती या परिस्थितीत योग्य ती काळजी घेत बियाणे खरेदी करण्यासाठी औरंगाबाद येथे पैठण रोड वरील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात येण्याचे करावे. दुसरे काही गावात बर्याच शेतकरी बांधवानी बियाणे मागणी केलेली आहे अशा गावातून सर्वच शेतकरी बांधवानी न येता सर्व मिळून वाहनाची सोय करत एक व्यक्तीस आमच्या कार्यालयात पाठवले तरी नोंदणी केल्याप्रमाणे बियाणे मिळेल. या सध्याच्या संकटात सर्वांनी स्वतः ची काळजी घेत आणि नियमाचे पालन करत बियाणे खरेदी करण्यासाठी यावे असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे,अशी माहिती रामेश्वर ठोंबरें विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद औरंगाबादाचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.
Leave a comment